Abhay Yojana : महापालिकेतर्फे आजपासून ‘अभय शास्ती ’योजना बंद; 105 कोटींच्या वसुलीचा उच्चांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Abhay Yojana : महापालिकेतर्फे आजपासून ‘अभय शास्ती ’योजना बंद; 105 कोटींच्या वसुलीचा उच्चांक

जळगाव : महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकीदारांसाठी सुरू केलेली अभय शास्ती योजना (Abhay Yojana) शनिवार (ता. १)पासून बंद करण्यात आली आहे. (Abhay Shasti Yojana started by Municipal Corporation for housing arrears was closed from 1 april jalgaon news)

आता थकबाकीदारांना दंड व व्याज लागू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली. दरम्यान, महापालिकेने या वर्षी १०५ कोटींची वसुली केले असून, हा उच्चांक असल्याचे सागंण्यात येत आहे.

महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी दंड व व्याज माफीसाठी ‘अभय शास्ती’ योजना राबविण्यात आली. ३१ मार्चपर्यंत तिची मुदत होती. शुक्रवारी (ता. ३१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

शेवटच्या दिवशी तब्बल ४ कोटी १२ लाखांची वसुली झाली. नागरिकांनी घरपट्टी भरण्यास चांगले सहकार्य केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. आता जे आगामी वर्षाची अगाऊ घरपट्टी भरतील, त्यांना दहा टक्के सूट देण्यात येणार आहे. ही मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.