नदीच्या पुलावर अचानक ट्रॉली उलटली; प्राण वाचले पण ? 

शंकर भांमरे | Friday, 8 January 2021

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात हे ट्रॅक्टर लावण्यासाठी जात होते. इतक्यात वाघूर नदीच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली कठड्यावर कोसळली.

पहूर (ता. जामनेर) : पहूर येथील वाघूर नदी पुलावर कापसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली कठड्यावर उलटल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली असली तरी शेतकऱ्याचे मात्र नुकसान झाले आहे. 

आवश्यक वाचा- नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने
 

पाळधी येथील शेतकरी योगेश धनगर यांनी येथील जिनिंग-प्रेसिंग येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर कापूस आणला होता. मात्र, तिथे जागा उपलब्ध नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात हे ट्रॅक्टर लावण्यासाठी जात होते. इतक्यात वाघूर नदीच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली कठड्यावर कोसळली. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने ट्रॉली व्यवस्थित करत असताना दोर तुटले आणि ट्रॉलीतील कापूस वाघूरच्या पाण्यात पडल्याने ओला झाला. 

Advertising
Advertising

 

जेसीबीच्या सहाय्याने पूर्ववत 
जेसीबी आणि पोकलॅन्डच्या सहाय्याने ट्रॅक्टर पूर्ववत करण्यात आले. या वेळी गणेश पांढरे, महेश पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांसह पोलिस, होमगार्डस यांनी मदत केली. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 

जामनेर