Jalgaon : वाळूची चोरटी वाहतूक सुरुच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sand illegal transportation reference image

Jalgaon : वाळूची चोरटी वाहतूक सुरुच

जळगाव : निमखेडी परिसरातील चंदू अण्णानगर चौकातून वाळूची चोरटी वाहतूक (transporting sand illegally) करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Action on tractor transporting sand illegally Jalgaon Crime news)

हेही वाचा: भुसावळ पालिकेच्या प्रभागरचना त्रुटींबाबत खंडपीठात याचिका

जळगाव शहरातील चंदू अण्णानगर चौकातून (एमएच २८ डी ६६८९) या क्रमाकांचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत वाळू चोरुन नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने त्यावर कारवाई करण्यात येऊन वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी प्रमोद भिकन सपकाळे (रा. कांचननगर) याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime : दुरुस्तीला आलेल्या दुचाकींच्या सुटे भागांची विक्री

Web Title: Action On Tractor Transporting Sand Illegally Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..