Jalgaon Crime News : गांजा सेवन करणाऱ्या 8 जणांवर कारवाई | Action taken against 8 people consuming ganja jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Jalgaon Crime News : गांजा सेवन करणाऱ्या 8 जणांवर कारवाई

Jalgaon Crime News : शहरात सार्वजनिक ठिकाणी चिलिमद्वारे गांजाचे सेवन करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईसत्र सुरू केले आहे. (Action taken against 8 people consuming ganja jalgaon crime news)

त्यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

यात अनसार अहमद शेख उस्मान (वय २८), अशोक डेमा सपकाळे (वय ४६), यादव भिका खंडारे (वय १८), राजेश देविदास बिऱ्हाडे (वय ४५), विजय पुंजाजी कांडेलकर (वय ४०), मोहन देविदास सोनवणे (वय ४१), शाहीद असलम गवळी (वय २१), राम बाबू मेश्राम (सर्व रा. भुसावळ) या संशयितांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, मंगेश गोंटला, सहायक फौजदार सत्तार शेख, पोलिस कर्मचारी विजय नरेकर, सुनील जोशी, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, सचिन पोळ, अतुल कुमावत, सचिन चौधरी, हेमंत जागडे आदींनी केली आहे.

टॅग्स :JalgaoncrimeDrugs