PM Awas Yojana : हप्ता घेऊनही घरकुल न बांधणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई

PM Awas Yojana
PM Awas Yojanaesakal

जळगाव : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास (PM Awas Yojana) योजनेंतर्गत २०१६ ते २०२२ या कालावधीत निवासी प्रयोजनासाठी घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात आली.

त्याचा पहिला हप्ता वितरित केल्यानंतर शंभर दिवसांच्या आत बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. (Action will be taken against the beneficiaries who do not build houses despite taking installments in pm awas yojana jalgaon news)

मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांत घरकुलांचे बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गटविकासाधिकाऱ्यांची बुधवारी (ता. २२) आढावा बैठक झाली.

बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी संचालक स्नेहा कुडचे उपस्थित होत्या. पाचोरा तालुक्यात ग्रामपंचायतींतर्गत घरकुल बांधकामासाठी परवानगी देऊन पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. अशा लाभार्थ्यांच्या समक्ष भेटी घेऊन समर्पक उत्तर न देणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

PM Awas Yojana
Jalgaon News : औद्योगिक कॉरिडोर, रस्त्यांसाठी हवे 500 कोटी; उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे

११६ लाभार्थींवर गुन्‍हे दाखलची प्रक्रिया

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, लोहारा, पिंपळगाव, कळमसरा, वडगाव, लाजगाव या ग्रामपंचायतींतर्गत घरकुलाचे काम सुरू न करणाऱ्या ११६ लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामसेवकांमार्फत संबंधित पोलिस ठाण्याला पत्र देण्यात आले आहे. पाचोऱ्यासह चाळीसगाव तालुक्यातील लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील घरकुलाची कामे सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील कामे सुरू असलेल्या घरकुलांची प्रगती, तसेच घरकुले मंजुरीची स्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठकीत जाणून घेतली.

PM Awas Yojana
Jalgaon News : अतिक्रमण रोखण्यासाठी दुकानदारांवरच कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com