
Jalgaon News : महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्याबाबतची अमंलबजावणी सुरू झाली आहे. (All municipal employees have been forced to wear helmets while coming to work jalgaon news)
महापालिका आस्थापना विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आल्याने काहींनी त्यांची अंमलबजावणी देखील केली. राज्य शासनाकडून वाहनधारकांना हेल्मेट वापरण्यासंदर्भात आवाहन करून प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ विभागाला तशा सूचना देण्यात आलेल्या होत्या.
त्याच धर्तीवर महापालिकेने देखील वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरण्याबाबत आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट घालून सुरक्षित प्रवास करावा.
ड्युटीवर येतानादेखील हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याची अमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी काही मनपा कर्मचारी वाहनावर येताना हेल्मेट घालून महापालिकेत आले असल्याचे दिसून आले. हेल्मेट न वापरणाऱ्यावर कारवाईचा बडगा महापालिकेने अद्याप उगारलेला नाही.