माझ्या मृत्यूस कुटुंबीयांना दोषी धरू नये!

किराणा दुकानात प्रौढाने घेतला गळफास
 गळफास
गळफासsakal

जळगाव - पिंप्राळा हुडको येथील गृहस्थाने किराणा दुकानात गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबातील कोणालाही दोषी धरु नये अशी चिठ्ठी मयताजवळ मिळून आली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शाबीर शेख कादीर (वय ५५, रा. पिंप्राळा हुडको) जळगाव असे मयताचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण मात्र समोर आले नाही.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख शबीर शेख कादीर पिंप्राळा हुडको येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. घराजवळच किराणा दुकान चालवून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (ता. १८) पहाटे शेख शबीर नमाज पठणाला जातो. असे, सांगून घराबाहेर पडले दिवसाचे आठ वाजले तरी ते घरी आले नाही. दुकानावर गेले असावेत, म्हणून मुलगा इम्रान याने किराणा दुकानात जाऊन पाहिले असता शेख शबीर यांनी दुकानातच गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. तत्काळ मृतदेह खाली उतरवून कुटुंबीयांनी जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केल्यावर रामानंदनगर पोलिसांत याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश पाटील व अजय सपकाळे पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com