
Jalgaon Crime News : 2 गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई
Jalgaon News : सतत गुन्ह्यात सहभागी, शहर व समाजात दहशत माजविणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आदेश मंगळराी पारित झाले. (An order was passed to place 2 persistent criminals who were terrorizing jalgaon crime news)
त्यात रामानंदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील रणजितसिंग जुन्नी (वय २८, रा. राजीव गांधीनगर) व अमळनेर पोलिसांच्या रेकॉर्डवरील रफीक ऊर्फ काजल शेख रशीद (३७, गांधीलपुरा) यांना दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करून त्यांची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली.
रणजितसिंग जुन्नी याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर अमळनेरच्या रफीकवर अकरा गुन्हे दाखल आहेत. रामानंदनगरच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, अमळनेरचे विजय शिंदे यांच्या पथकाने संशयितांची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील, सुनील दमोदरे व त्यांच्या पथकाने आलेल्या प्रस्तावांची छाननी करून रेकॉर्ड पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केले.
नंतर जिल्हा व न्यायदंडाधिकारी अमन मित्तल यांच्या समक्ष प्रस्ताव मांडून दोन्ही संशयितांना दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करून अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले.