Anandacha Shidha : जिल्ह्यात 54 टक्के लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप | Anandacha shidha has been distributed to 54 percent beneficiaries in district jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anandacha Shidha

Anandacha Shidha : जिल्ह्यात 54 टक्के लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

Anandacha Shidha : गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने रवा, साखर, चना डाळ आणि पामतेल असा आनंदाचा शिधा (Jalgaon News) देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५४ टक्के लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. (Anandacha shidha has been distributed to 54 percent beneficiaries in district jalgaon news)

सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि भाजप सरकारने मागील दिवाळीला आनंदाचा शिधा किटचे वितरण केले होते. अवघ्या १०० रुपयांत चार जिन्नस या माध्यमातून लाभार्थ्यांना दिले होते. आता गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला.

गुढीपाडव्याला हा शिधा मिळाला नसला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना हा शिधा वितरीत केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ५४ टक्के लाभार्थ्यांना या किटचे वितरण करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तालुकानिहाय असे झाले वाटप

अमळनेर ६३.०३ टक्के, भडगाव ४१.०७, भुसावळ ९८.३७, बोदवड ७६.६३, चाळीसगाव ३७.६१, चोपडा ३७.३३, धरणगाव ४७.२५, एरंडोल ६३.७४, जळगाव ५८.७८, जामनेर ५९.२१, मुक्ताईनगर ३६.२६, पाचोरा ३७.९५, पारोळा ८४.६८, रावेर ३४.०३, यावल ६५.०५ टक्के, असे एकूण ५४ टक्के लाभार्थ्यांना किटचे वितरण झाले आहे.

टॅग्स :JalgaonBabasaheb Ambedkar