Jalgaon Job Fair : रोजगार मेळाव्यात 322 विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्र; सुमारे 400 उमेदवारांची उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Appointment letter for 322 students in employment fair in pachora jalgaon news

Jalgaon Job Fair : रोजगार मेळाव्यात 322 विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्र; सुमारे 400 उमेदवारांची उपस्थिती

पाचोरा (जि. जळगाव) : येथील पीटीसी संस्था, गो. से. हायस्कूल, एमसीव्हीसी विभाग व डीडीके प्रायव्हेट लिमिटेड नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास बेरोजगारांचा चांगला प्रतिसाद लाभला. (Appointment letter for 322 students in employment fair in pachora jalgaon news)

सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली त्यातून ३२२ विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. गो. से. हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय रोजगार मेळावा झाला. पीटीसी संस्थेचे उपाध्यक्ष तथा उमवि सिनेट सदस्य व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार ओंकार (आप्पा) वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करून रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले.

या प्रसंगी खलील देशमुख, टीडीके कंपनीचे व्यवस्थापक मनोज पाटील, श्री. लगडे, रवींद्र बराटे, प्राचार्या प्रमिला वाघ, किमान कौशल्य विभाग प्रमुख प्रा. मनीष बाविस्कर, तांत्रिक विभागप्रमुख एस. एन. पाटील, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, आर. एल. पाटील, अजय अहिरे उपस्थित होते. रुपेश पाटील यांनी स्वागतगीत गायिले. प्रा. मनीष बाविस्कर यांनी रोजगार मेळाव्याचे महत्त्व व आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

प्रमिला वाघ, व्ही. टी. जोशी, खलील देशमुख, मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुलाखतीत पात्र ३२२ विद्यार्थ्यांना कंपनीत रुजू होण्यासाठी नियुक्तिपत्र देण्यात आले. मेळावा यशस्वीतेसाठी दिनेश पाटील, शरद माथुरवैश्य, वैशाली भदाणे, सुनील मणियार, एस. डी. वाणी, गौरव सोनवणे, श्री. धनगर यांनी परिश्रम घेतले. प्रा. मनीष बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले. सुनील मनियार यांनी सूत्रसंचलन केले. दिनेश पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaon