Bribe News : पत्त्याचा क्लब सुरू ठेवण्यासाठी सहायक फौजदाराने घेतली लाच; साथीदारासह ACBच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe case

Bribe News : पत्त्याचा क्लब सुरू ठेवण्यासाठी सहायक फौजदाराने घेतली लाच; साथीदारासह ACBच्या जाळ्यात

फैजपूर (ता. यावल) : अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदारासह दोघा पोलिसांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (ता. २४) दुपारी तीनच्या सुमारास पोलिस ठाण्यातच अटक केली.

फैजपूर पोलिस ठाणे अंतर्गत बामणोद बिटचे सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांच्यासह पोलिस नाईक किरण अनिल चाटे, महेश ईश्वर वंजारी या दोन पोलिसांना फैजपूर भागातील अवैध धंदे चालकाकडे पत्त्याचा क्लब नियमित सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयितांनी चार हजारांची लाच मागणी केली.

याबाबत पत्त्याचा क्लब चालकाने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. फैजपूर पोलिस ठाण्याच्या आवारात चार हजार घेताना सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांच्यासह पोलिस नाईक किरण चाटे, महेश वंजारी या दोघांचा सहभाग आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली.

तिन्ही संशयिताविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एसीबीचे उपअधीक्षक शशिकांत पाटील व सहकाऱ्यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

सापळा पथकात सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, राकेश दुसाने हे तर कारवाईत मदत पथक म्हणून पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांची मदत झाली.

टॅग्स :Jalgaonpolicebribe