Jalgaon News : गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये डबल चेंबर्स थेरपी शस्त्रक्रिया; रुग्णास जीवदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cardiologist with the patient who underwent surgery. Vivek Chaudhary.

Jalgaon News : गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये डबल चेंबर्स थेरपी शस्त्रक्रिया; रुग्णास जीवदान!

जळगाव : जिल्ह्यातील आधुनिक व सुसज्ज श्री गजानन हार्ट (Heart) हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर अद्ययावत डबल चेंबर्स थेरपी वापरून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली

आणि त्याद्वारे रुग्णाचा जीव वाचविण्यात हॉस्पिटलच्या टीमला यश आले. (At Gajanan Heart Hospital Double chamber therapy surgery successful jalgaon news)

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील वासुदेव तोताराम वराडे (वय ६२) हे हृदयरोगी असून, त्यांच्यावर आधीच दोनदा ॲन्जिओप्लास्टी झाली होती. मात्र, तरीही त्यांचे हृदय पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने पंपिंगची क्षमता २३ टक्क्यांपर्यंतच होती. हृदयातील मायट्रल व्हॉल्व्ह लिक झाला होता. त्यांना उपचारासाठी श्री गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉ. विवेक चौधरी यांनी त्यांची तपासणी करून त्यांना डीडीडीआर चेंबर सीआरटीपी थेरपी करण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लीष्ट व गुंतागुंतीची होती. डॉ. चौधरी व त्यांच्या टीमने हे आव्हान पेलून जवळपास अडीच तासांच्या परिश्रमांअंती ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. याद्वारे रुग्णाच्या हृदयाच्या लिक झालेल्या मायट्रल व्हॉल्व्हमध्ये सुधारण होऊन पंपिंग क्षमता ३५ टक्क्यांपर्यंत वाढली. नंतर रुग्णास घरी सोडण्यात आले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

"गेल्या काही वर्षांपासून मी डॉ. विवेक चौधरी यांचा रुग्ण आहे. त्यांनी २००८ व २०१३ मध्ये माझ्यावर ॲन्जिओप्लास्टी केली. आताही पुन्हा त्रास झाल्यानंतर त्यांनी अत्यंत क्लीष्ट शस्त्रक्रिया यशस्वी करून मला जीवदान दिले." -वासुदेव वराडे, रुग्ण