Wed, May 31, 2023

Jalgaon News : दगडाच्या मदतीने ATM फोडण्याच्या प्रयत्न
Published on : 14 March 2023, 2:30 pm
जळगाव : कानळदा (ता. जळगाव) बसस्थानकाजवळील एटीएम दगडाच्या मदतीने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Attempts to break ATM with stone jalgaon crime news)
कानळदा बसस्थानकाजवळ स्टेट बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री एकाने दगड मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला लक्षात आला. जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
पोलिसांनी पथक तयार करून कारवाईची सूचना दिल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्याचे नाव सांगण्यास नकार दिला व चौकशी सुरू असल्याचे सांगितले.