
Jalgaon Crime News : घर फोडून ऐवज लंपास
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील आयोध्यानगरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल चोरून (Theft) नेला. (Ayodhya Nagar closed house was broken and looted jalgaon crime news)
आयोध्यानगरातील स्वॉफ्टवेअर इंजिनिअर प्रवीण सुधाकर इंगळे (वय ३४) ४ मार्चला सकाळी दहाला घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लॅपटॉप, मोबाईल, रोकड आणि सोन्याचे दागिने, असा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
बुधवारी (ता. ८) सकाळी अकराला त्यांच्या घराचे दार उघडे दिसल्यावर शेजाऱ्यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून कळविले. घरी परतल्यावर त्यांना घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केलेला दिसला. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रामकृष्ण पाटील तपास करीत आहे.