NMU Election Result : ‘उमवि’ अधिसभेवर विकास मंचचे वर्चस्व कायम

NMU News
NMU Newsesakal

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांपैकी ‘अभाविप’ पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने नऊ जागांवर विजय मिळवून वर्चस्व कायम राखले आहे.

प्रतिस्पर्धी विद्यापीठ विकास आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. बुधवारी (ता. १) ही मतमोजणी सुरू होऊन गुरुवारी (ता. २) मध्यरात्री सव्वातीनला आटोपली. (Bahinabai Chaudhari Uttar Maharashtra University Senate Final Result Vikas Manch continued to dominate the Adhisabha Jalgaon News)

NMU News
Jalgaon News : कौटुंबीक न्यायालयाच्या अधीक्षकाला लाच घेताना अटक

बुधवारी सकाळी दहाला मतमोजणीला प्रारंभ झाला. जवळपास १७ तास मतमोजणी चालली. खुल्या संवर्गातून पाच जागा निवडून द्यावयाच्या होत्या. पहिल्या फेरीत अमोल पाटील व विष्णू भंगाळे निवडून आले.

मात्र, उर्वरित तीन उमेदवारांना निर्धारित कोटा पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर अमोल मराठे विजयी झाले, तर नवव्या फेरीअखेर सुनील निकम आणि अमोल सोनवणे यांनी कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा :'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

NMU News
Manasi Naik: 'खूप वर्ष वाट पाहिली शेवटी..', मानसी नाईकनं दिली Good News..

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील, निवडणूक विभागप्रमुख इंजिनिअर राजेश पाटील, फुलचंद अग्रवाल, डॉ. मुनाफ शेख यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन अत्यंत शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

विजयी उमेदवार असे

खुला संवर्ग (जागा) : अमोल नाना पाटील (पहिल्या फेरीत विजयी, प्राप्त मते २०५१), विष्णु भंगाळे (पहिल्या फेरीत विजयी, १६८६), अमोल मराठे (सातव्या फेरीअखेर विजयी, १६७५), सुनील निकम (नवव्याफेरी अखेर विजयी, १७३६), अमोल सोनवणे (नवव्या फेरीअखेर विजयी, १६७१), इतर मागास (१ जागा) : नितीन झाल्टे (६८६०), अनुसूचित जाती (१ जागा) : दिनेश खरात (६७१९), अनुसूचित जमाती (१ जागा) : नितीन ठाकूर (७६७६), विमुक्त जाती-भटक्या जमाती (१ जागा) : दिनेश चव्हाण (७१५१), महिला संवर्ग (१ जागा) : स्वप्नाली महाजन (६२३८).

NMU News
Satara News: गाळपात ‘जरंडेश्वर’, ‘कृष्णा’ची आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com