जळगाव : नैराश्यातून बंगाली कामगाराची आत्महत्या

suicide
suicideesakal

जळगाव : बंगाली सोने कारागीर तरुणाने नैराश्यातून रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा अपलाईन दरम्यान घडली. प्रसनजीत प्राणकिशन कबीराज (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून शहरातील मारोती पेठेत प्रसनजीत कबीराज हा सराफा कामांसाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करीत होता. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर रात्री तो आपल्या सहकाऱ्यांना मी बाहेरून नाश्ता करून येतो असे सांगून तो दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. जळगावात आल्यापासून प्रसनजीत हा नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.

suicide
वर्षभरात सात रेशन दुकानांचा परवाना रद्द, ४३ निलंबित

आधारमुळे पटली ओळख

स्टेशन प्रबंधक एम. अग्रवाल यांनी माहिती दिल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधाराकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. त्यांनी ही माहिती त्याच्या मित्रांना दिल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

suicide
आरोग्य विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com