‘सकाळ’चे शंकर टेमघरे यांना भागवत धर्मप्रसारक पुरस्कार जाहीर

श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे दिला जाणारा ‘भागवत धर्मप्रसारक’ पुरस्कार पुणे येथील ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे यांना जाहीर झाला आहे.
‘सकाळ’चे शंकर टेमघरे यांना भागवत धर्मप्रसारक पुरस्कार जाहीर
SYSTEM

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे दिला जाणारा ‘भागवत धर्मप्रसारक’ पुरस्कार पुणे येथील ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे यांना जाहीर झाला आहे.

श्रीक्षेत्र कोथळी येथे पुरस्काराची घोषणा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केली. येथून संत मुक्ताबाईंच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे गुरुवारी (ता. ३) प्रस्थान ठेवले. या पार्श्वभूमीवर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या वेळी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते. ॲड. पाटील यांनी सांगितले, की श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष (स्व.) भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून ‘भागवत धर्मप्रसारक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. २०१९ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला होता. त्यानंतर कोरोनामुळे सलग दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण करता आले नव्हते. हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी (१० जुलै) दुपारी दोनला पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या मठात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

‘सकाळ’चे शंकर टेमघरे यांना भागवत धर्मप्रसारक पुरस्कार जाहीर
कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळणार टपाल कार्यालयातून

श्री. टेमघरे १९९५ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. त्यांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास आहे. १९९६ पासून ते वारीचे वार्तांकन करीत असून, ‘सकाळ’ वृत्तपत्रासह साम टीव्हीवरील वारी विशेष मालिकेची संकल्पना, संशोधन व लेखन ते करीत आहेत. त्यांनी श्री संत नामदेव महाराजांच्या जीवनावर आधारित ‘प्रेमभंडारी’ आणि ‘ज्ञानभंडारा’ या पुस्तकांचे लेखन केले आहे.

‘सकाळ’चे शंकर टेमघरे यांना भागवत धर्मप्रसारक पुरस्कार जाहीर
सचिन तेंडूलकरने लहानग्या अनयला स्वाक्षरीसह पाठवले पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com