Jalgaon News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जागेचे 23 ला भूमिपूजन | Bhumi Pujan of Chhatrapati Shivaji Maharaj statue site on 23 april jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deputy Mayor Kulbhushan Patil, Shiv Sena District Liaison Chief Sanjay Sawant inspecting the place for statue of Chhatrapati Shivaji Maharaj.

Jalgaon News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जागेचे 23 ला भूमिपूजन

Jalgaon News : पिंप्राळा येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळा जागेचे भूमिपूजन रविवारी (ता. २३) शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली. (Bhumi Pujan of Chhatrapati Shivaji Maharaj statue site on 23 april jalgaon news)

याबाबत श्री. पाटील यांनी सांगितले, की पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासाठी मंजुरीही दिली आहे. पुतळ्याचे कामही पूर्ण होत आहे.

या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी होईल. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पुतळ्याच्या जागेची सोमवारी (ता. १७) पाहणी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहरप्रमुख शरद तायडे व उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.