भुसावळला यात्रेत चेंगराचेंगरी; बारागाड्यांखाली येऊन एकजण ठार

बारागाड्यांखाली येऊन एकजण ठार, सहा जखमी; सणावर शोककळा
Bhusawal festival
Bhusawal festival

भुसावळ : शहरातील सतारे भागातील ग्रामदैवत मरिमातेच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २) सायंकाळी साडेसहाला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमचा समारोप होत असताना बारा गाड्यांखाली चेंगरुन एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. गुढीपाडव्याच्या आनंदात असताना ही दुर्घटना घडल्याने शहरात शोककळा पसरली.

गुढीपाडव्यानिमित्त मरिमाता यात्रोत्सवाची शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. जळगाव रोडवरील जुना सतारे भागातील मरिमाता मंदिराजवळ बारागाड्या ओढल्या जातात. यंदा कोरोना निर्बंध शिथिल झाल्‍यामुळे मोठी गर्दी होती.

बारागाड्या धावत असताना काही लोक चाकाखाली दाबले गेले. यात कुणाच्या पोटावरून तर कुणाच्या हातापायांवरून गाड्यांचे चाके गेली. घटना घडताच जखमींना गाड्यांखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गिरीष कोल्हे यांचा गोदावरी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

छोटू इंगळे (वय ३३), धर्मराज कोळी (वय ६३), मुकेश यशवंत पाटील (वय २८), नितीन फेगडे (वय ४०) दीपक कोळी यांसह आणखी एक जण जखमी झाला आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com