भुसावळला २३ कोटींची पाणीयोजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

भुसावळला २३ कोटींची पाणीयोजना

भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे पानाचेसह महादेवमाळ, वराडसीम, जोगलखोरी, गोजोरे, मोंढाळे या सहा गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल २३ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

साधारणतः २००८ पर्यंत या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत होती. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी याच गावांना २००८ मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करून तेव्हापर्यंत भेडसावणारा पाण्याचा प्रश्‍न कायम निकाली काढला होता. आता १५ वर्षांनी हीच योजना अधिक अद्ययावत स्वरूपात आणि आगामी ३० वर्षांचा वेध घेऊन नव्याने अंमलात येणार आहे. त्यामुळे कुऱ्हे परिसरातील जनतेला आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडून महत्त्वाची भेट मिळाली आहे.

यासाठी आमदार संजय सावकारे यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. जिल्हा परिषदेचे माजी शिवसेना गटनेते विश्‍वनाथ पाटील यांनी २००८ मध्य कुऱ्हे‍ गावासह तीन गावांसाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. यामुळे कुऱ्हे पानाचे, वराडसीम, गोजोरा आदी गावांसाठी वाघूर धरणावरील कंडारी गावाच्या भागात असलेल्या बॅकवॉटर परिसरातून पाण्याचा स्रोत वापरून पाणी उचलण्यात आले होते. तेथूनच ग्रामस्थांना पाण्याचा पुरवठा होत होता. ही योजना आतापर्यंत सुरू असून यामुळे सदर तिन्ही गावांची पाणीटंचाई कायमची संपुष्टात आलेली आहे.

२०५४ ची लोकसंख्या गृहित

आमदार गुलाबराव पाटील यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भविष्याचा वेध घेऊन त्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी गावागावात लोकसंख्या वाढत असते. त्यादृष्टीने ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात साकारत असताना आगामी ३० वर्षांनी वाढणारी होणारी म्हणजेच २०५४ सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार, दरडोई ५५ लिटर मानकानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सदर योजनेचे अंदाजे मूल्य २३ कोटी ४७ लक्ष ६८ हजार रूपये आहे.

अशी असेल योजना

कुऱ्हे तीन गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारेवरील सहाही गावांना शुध्द पाणीपुरवठा हेाईल. पाण्याचा मुख्य स्त्रोत हा भुसावळ ते जामनेर रस्त्यावरील वाघूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात घेण्यात येणार आहे. या ठिकाणी सहा मीटर व्यासाची जॅकवेल आणि याला ऍप्रोच ब्रीज उभारण्यात येणार आहे. तेथून डीआय पाईपांच्या मदतीने पाणी महादेव माळ येथील

जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले जाईल, येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते शुध्द

करण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक गावात ते पुरविले जाईल. एकूणच या सर्व

कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच काम मार्गी लागणार आहे.

Web Title: Bhusawal Water Scheme 23 Crore Gulabrao Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top