Jalgoan Accident News : रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | Bike rider killed in accident with rickshaw jalgaon accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Jalgoan Accident News : रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Jalgaon News : नशिराबाद (ता. जळगाव)जवळील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव ॲपेरिक्षाचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तरुण ठार झाला. (Bike rider killed in accident with rickshaw jalgaon accident news)

नशिराबादजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून अनिल संजय सपकाळे (रा. साकेगाव) आणि अमोल आनंदा सपकाळे (वय २०, रा. दाभाडी, ता. जामनेर) १९ मेस सायंकाळी साडेसातच्या सुमारास भुसावळ येथून कपडे खरेदी करून बेळी येथे परत जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ डीजे ९९३)वरून जाण्यासाठी निघाले.

रेल्वे उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या ॲपेरिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघे दुभाजकावर पडले.

अमोल सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अनिल सपकाळे गंभीर जखमी झाला.

अनिल सपकाळे याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर अनिल सपकाळे यांनी सोमवारी (ता. २९) सायंकाळी सातला दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikdeadaccident case