Latest Jalgaon News | मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon : मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरून येणाऱ्या सुसाट मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना रविवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास घडली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (Bike rider killed in collision with cargo vehicle Latest Jalgaon News)

हेही वाचा: Pollution in Diwali : फटाक्यांची आतषबाजी अन् प्रदूषणाची चिंता!

भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वार एफडीलक्स मोटारसायकल (एमएच ३०, बीएन ४४६२)ने येत होता. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच सुसाट येणाऱ्या मालवाहू वाहने दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहनांच्या प्रचंड वेगाने दुचाकीस्वार फेकला जाऊन अवजड वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख, गोविंदा पाटील, शुद्धोधन ढवळे, समाधान टहाकळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळ गाठले.

मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात दाखल नेण्यात आला, तर अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली. घटनास्थळी मृत तरुणाजवळ सापडलेल्या मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मोबाईलला पॅटर्न लॉक असल्याने समोरून फोन आल्याशिवाय मृताची ओळख पटणे अशक्य असल्याने रात्री उशिरापर्यंत मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: Nashik : वर्धा- बडनेरा सेक्शनवर मालाचे डबे रुळावरून घसरले; हे आहेत मार्ग बदल