
अश्लिल फोटोच्या आधारे तरुणीचे ब्लॅकमेलींग
जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)
हेही वाचा: काय तो चिखल!काय ते खड्डे, काय ती लाईट! सगळं कस ओके जुनी सांगवीतील पवारनगर रस्त्यावर लावलेला फलक सोशल मीडिया वर होतोय व्हायरल-
जळगाव शहरात रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. ८ ते १६ जुलै असे आठ दिवस पीडितेच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर तिचे फोटो एडिट करून सोबत इतरांचे अश्लील फोटो पाठवत विनयभंग केला. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. तरुणीने तातडीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.
हेही वाचा: खासदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या दिल्लीतील महिलेविरोधात गुन्हा
Web Title: Blackmailing Of Young Girl Offensive Images Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..