Jalgaon News : ईपीएस 95 निवृत्तिधारकांचा रास्ता रोको; 15 मार्चला जळगावात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation

Jalgaon News : ईपीएस 95 निवृत्तिधारकांचा रास्ता रोको; 15 मार्चला जळगावात आंदोलन

जळगाव : विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्याने येत्या १५ मार्चला जळगावात संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. (Block way for EPS 95 pensioners Protest in Jalgaon on March 15 Jalgaon News)

भारतात ईपीएस ९५ पेन्शनर किमान रुपये ७,५०० अधिक महागाई भत्ता, दरमहा पेन्शन व वैद्यकीय सुविधा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यांनी स्वतः त्यांच्या वेतनातून दरमहा रुपये ४१७, ५४१ व १,२५० असे योगदान दिले असून, त्यांना आता फक्त एक हजार ते तीन हजार एवढेच तुटपुंजे पेन्शन मिळत आहे़.

ही त्यांची थट्टाच आहे. औद्यागिक, सहकारी, सार्वजनिक, खासगी क्षेत्रात यांनी आपल्या आयुष्याची ३० ते ३५ वर्षे खर्ची घालूनही त्यांना वृद्धावस्थेत रस्त्यावर यावे लागत आहे, ही शोकांतिका आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ मागील पाच-सहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहे़. पंतप्रधानांची दोन वेळा भेट घेऊन आश्वासन मिळाली आहेत. केंद्रीय श्रममंत्री, वित्तमंत्री यांची अनेक वेळा भेट घेऊनही मागणी पूर्ण होत नाही म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आदेशानुसार जळगावला १५ मार्चला आकाशवाणी चौकात सकाळी अकराला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक अनिल पवार व जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonagitation news