Jalgaon Crime News : कडगावमध्ये दोघांना बेदम मारहाण

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon News : कडगाव (ता. जळगाव) येथील बसस्थानकाजवळ मोबाईल चार्जर मागिल्यावरून चालकासह एकाला शिवीगाळ करून लाठ्याकाठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

कडगाव येथील गणेश बाबूराव कोळी (वय ३२) याने मंगळवारी (ता. २३) सकाळी नऊला बसस्थानकाजवळ सुनील प्रकाश कोळी यांच्याकडे मोबाईलचे चार्जर मागितले. (Both in Kadegaon brutal beating Jalgaon crime News)

याचा राग आल्याने सुनील कोळी, अनिल कोळी व इतर अनोळखी चौघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

भूषण शांताराम कोळी याने मध्यस्थी केली असता, त्यालाही मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik News : मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर-ताल-नृत्य

या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले.

शनिवारी (ता. २७) रात्री दहाला नशिराबाद पोलिस ठाण्यात सुनील कोळी, अनिल कोळी, आणि इतर चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहे.

Crime News
Jalgaon News : मुख्यमंत्र्यांकडून सोनवणे दांपत्याच्या तब्येतीची चौकशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com