Jalgaon News : कोरड्या पिंपळाच्या झाडाची तुटली फांदी; मनपा-महावितरणाच्या वादात गेला असता चौघांचा जीव

Jalgaon News
Jalgaon Newsesakal

जळगाव : शहरतील पटेल प्लाझा कॉम्प्लेक्सशेजारील भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाची कोरडी फांदी अचानक कोसळली. दुपारी बाराला ऐन गर्दीच्या वेळेस कोसळलेल्या फांदीखाली दुचाकी दाबली गेली. मात्र, चौघांचा जीव थोडक्यात वाचला. महापालिका आणि महावितरण कंपनी यांच्यात वर्षभरापासून हा कोरडा वृक्ष काढण्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे.

Jalgaon Politics News : ...या हास्यामागे दडलंय काय? रश्मी ठाकरे, वैशाली सूर्यवंशी यांच्यातील चर्चेकडे लक्ष

गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ आमदार चंदू पटेल यांच्या मालकीच्या पटेल प्लाझा कॉम्पलेक्समध्ये बँका-फायनान्स कंपन्यांची कार्यालये असून, नेहमीच गर्दी असते. कॉम्प्लेक्सजवळ भला मोठा पिंपळवृक्ष आहे. चारही बाजूने महावितरण कंपनीची मोठी डीपी असून, वृक्षाला चारही बाजूंनी वीजखांबानी घेरले आहे.

कोरोना काळात वीज पडून वृक्षाचा बहुतांश भाग कोरडा पडला असून, आकाशात झेपावणाऱ्या फांद्याही पूर्णपणे कोरड्याठाक पडल्या आहेत. गेल्या वर्षी एक फांदी पडल्याने जे. के. पानमंदिरचे संचालक कैलास व संतोष शेळके यांनी महापालिकेला लेखी अर्ज देऊन वृक्ष काढण्याची विनंती केली होती.

त्यासाठी अधिकृत पावतीही फाडली होती. महापालिकेचे पथक आले व त्यांनी आकाशाच्या दिशेतील मोठी कोरडी फांदी तोडण्याऐवजी खालचीच फांदी तोडून आम्ही इतकेच करू शकतो. तुम्ही वीज कंपनीकडे तक्रार करा. यापुढचे काम आमचे नाही, असे सांगून निघून गेले.

Jalgaon News
Jalgaon News : महासभेत जोरदार खडाजंगी; खडसे, जगवानी, भोळेंमुळे गाळेधारकांची दिशाभूल..

थोडक्यात वाचला जीव

दुपारी बाराच्या सुमारास ओम शेळके व चेतन शेळके संजीव यांच्याशी बोलत उभे होते. इतक्यात मोठा आवाज झाल्याने तिघे- चौघे जीव वाचविण्यासाठी पळू लागले. शेकडो टन वजनी कोरडी फांदी वीजतारांमुळे काही सेकंद अडल्याने चौघांना जीव वाचविण्याची संधी मिळाली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मग आले महापालिकेचे पथक

फांदी खाली उभ्या चौघांचा जीव वाचला. मात्र, दोन दुचाकींचा चुराडा झाला. महापालिकेला फोन केल्यावर कोसळलेली फांदी उचलण्यासाठी महापालिकेचे पथक आले. उर्वरित कोरड्या वृक्षासाठी महापालिकेने परत वीज कंपनीकडे बोट केले.

Jalgaon News
Jalgaon Crime News : मित्रांच्या पार्टीत गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह; तरवाडे येथील घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com