Latest Marathi News | बहिणीच्या भेटीपूर्वीच भावावर काळाचा घाला; अपघातात तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicidal death news

बहिणीच्या भेटीपूर्वीच भावावर काळाचा घाला; अपघातात तरुणाचा मृत्यू


पातोंडा (ता. अमळनेर) : येथून जवळ असलेल्या गॅस एजन्सीजवळ सोमवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात बहिणीला रक्षाबंधनासाठी भेटायाला जाणारा टोळी (ता. पारोळा) येथील तरुण मनोज युवराज पाटील (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

टोळी येथील मनोज पाटील हा सावखेडा येथे आपल्या बहिणीला भेटायला येत असताना विसपुते इंडेन गॅस एजन्सीजवळ इगतपुरी आगाराची चोपडा-नाशिक बसने (एमएच ४०, वाय ५९७७) अमळनेरकडे जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९, डीजी ९०४५) जोरदार धडक दिली. यात मनोज पाटील हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. चोपडा -नाशिक बसचे चालक गोकुळ दौलत चौधरी (रा. मालेगाव) अमळनेर पोलिस ठाण्यात जमा झाला असून, पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: नाशिक : व्यापाऱ्याचा शेतकऱ्यांना 12 लाखाला गंडा

मनोज पाटील हा एकुलता एक मुलगा व दोन बहिणींचा लाडका भाऊ होता. रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेटायला येत असताना मला नवीन कपडे घेऊन दे, असा दूरध्वनीवरून आग्रह धरला होता. परंतु बहिणीचे गाव अवघ्या तीन किलोमीटरवर असतानाच काळाने डाव साधला. मनोजचे आई, वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मनोज हा आपल्या कुटुंबाचा कमावता आधार होता. मनोजच्या निधनाची बातमी कळताच टोळी गावावर शोककळा पसरली. पातोंडा गावाजवळ अपघात झाल्याचे कळताच गावातील तरूण समाधान पाटील, रत्नाकर पवार, सोपान लोहार, महेंद्र पाटील, केतन ढिवरे, मंगेश पवार व तरुणांनी धाव घेत सहकार्य केले. समाधान पाटील याने अमळनेर पोलिस ठाण्यात व टोळी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

हेही वाचा: रत्नागिरी नोकरीच्या आमिषाने महिलाना 5 लाखाला गंडा

दुचाकीने घेतला पेट

अपघात एवढा भीषण होता, की धडक झाल्यानंतर दुचाकी बसच्या पुढील भागात अडकून बरेच अंतर ओढली गेली व घर्षणाने स्पार्किंग होऊन दुचाकीने पेट घेतला. दुचाकीचा धूर बसमध्ये आल्याने बसने पेट घेतल्याच्या संशयाने बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, बसचालकाच्या अतिवेगाने दीड महिन्यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याने बसचालकांबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Brother Killed In Accident Before Rakshabandhan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..