Jalgaon News : हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Jalgaon News : हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार

मेहुणबारे (जि. जळगाव) : बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घालून अनेक पशुबळी घेतले. या बिबट्याला अखेर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात

वन विभागाला यश आले असले तरी तरी जामदा (ता. चाळीसगाव) शिवारात हिंस्त्र प्राण्यांनी पशुधनाची शिकार केली. (buffalo Pardu was killed in an attack by leopard jalgaon news)

विशेष म्हणजे, शेतात गुरांची राखण करण्यासाठी शेतकरी गुरांपासून दहा ते बारा फूट अंतरावर झोपलेला असताना देखील रात्री म्हशीचे पारडू फस्त केले. शिवाय तेथे बांधलेला बोकडही पळवून नेला. शेतकऱ्यांनी हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा दावा केला आहे.

तर वन विभागाने मात्र कुठल्याही प्रकाराचे पगमाग दिसून न आल्याने हा हल्ला हिंस्त्र प्राण्यांनी केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहे.

दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र कौतिक देवरे यांचे जामदा शिवारात शेत आहे. या शेतात त्यांची गुरे बांधलेली असतात. बहाळ शिवारात बिबट्याकडून पशुधनावर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजेंद्र देवरे हे गुरांची राखण करण्यासाठी रात्री शेतातच झोपतात. नेहमीप्रमाणे ते रात्री शेतात झोपण्यासाठी गेले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

जेथे गुरे बांधलेली होती त्यापासून दहा ते बारा फूट अंतरावर खाटेवर झोपलेले असताना मध्यरात्री हिंस्त्र प्राण्यांनी शेतात बांधलेल्या म्हशीच्या पारडूवर हल्ला केला. पारडूची शिकार केल्यानंतर एवढ्यावर न थांबता बाजूला बांधलेला बोकडही पळवून नेला. पहाटे देवरे यांना जाग आल्यावर हा प्रकार लक्षात आला.

या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बहाळ येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त होत नाही, तोच आता जामदा शिवारात हा प्रकार घडला.

म्हशीचे पारडू ठार करून बोकड पळवून नेणारा हा बिबट्याच असावा व काही दिवसांपूर्वी भऊर शिवारात उसाच्या शेतात जे बिबट्याचे बछडे आढळून आले, त्या बछड्यांची ही मादी बिबट असावा, असा शेतकऱ्यांचा कयास आहे. या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली.

टॅग्स :JalgaonLeopardBuffaloes