Jalgaon Crime News : रावेरला 5 ठिकाणी घरफोड्या | Burglary at 5 places in Raver jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Jalgaon Crime News : रावेरला 5 ठिकाणी घरफोड्या

Jalgaon Crime News : येथील अष्टविनायकनगर व परिसरातील बंद दरवाजाची संधी साधून चार ते पाच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एका ठिकाणी सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. (Burglary at 5 places in Raver jalgaon crime news)

या बाबत रावेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. येथील अष्टविनायक नगरातील रमेश चौधरी हे नागपूर येथे आपल्या मुलीकडे गेले होते.

ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातून दहा हजार रुपये रोख व सात हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या बाबत चौधरी यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या कॉलनी परिसरातील तीन चार बंद घराचे कुलूप तोडले. मात्र या घरांचे घरमालक बाहेरगावी गेल्यामुळे चोरीचा तपशील समजू शकला नाही. पोलिस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrimerobberythief