Jalgaon Crime News : शिवकॉलनीत घरफोडी; रोकड, टीव्हीसह वाहन लंपास

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील शिवकॉलनीतील बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड, टीव्हीसह दुचाकी चोरून नेली. नंदनवन कॉलनीतील डॉ. सुशील गुर्जर यांच्या शिवकॉलनीतील घरात त्यांचे मेहुणे वास्तव्यास आहेत.

कामानिमित्त ते २९ एप्रिल ते ६ मेपर्यंत घर बंद करून बाहेर गावी गेले होते. चोरट्यांनी गुर्जर यांचे बंद घर फोडले. (Burglary in Shiva Colony Cash Vehicle stolen with TV Jalgaon Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime News
Osmanabad Crime : खेळायला गेले अन् परतलेच नाही; खदाणीमध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू

शनिवारी (ता. ६) गुर्जर यांचे मेहुणे बाहेर गावाहून परतल्यावर त्यांना कंपाऊंडमध्ये उभी दुचाकी दिसली नाही. त्यांनी आत जाऊन बघितले असता, घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घरात पाहणी केली असता, ११ हजारांची रोकड, भिंतीवरील एलईडी दिसून आला नाही. तत्काळ त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटना कळविली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत डॉ. सुशील गुर्जर यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सुशील चौधरी तपास करीत आहे.

Crime News
Crime News: आधी जामीन मिळवून दिला अन् नंतर केली हत्या; शेतकऱ्याने मुलाच्या हत्येचा घेतला बदला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com