
Jalgaon Crime News : घराचा कडीकोंडा तोडून 53 हजाराची घरफोडी
अमळनेर (जि. जळगाव) : घरमालक घरात झोपलेले असताना घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने (Thief) रोख रक्कम, दागिन्यांसह एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. १४) रात्री घडली. (Burglary of 53 thousand by breaking door of house jalgaon crime news)
येथील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या मागील बाजूस असलेल्या गणेश कॉलनीत राहणाऱ्या शीतल दीपक पवार या बुधवारी (ता. १५) पहाटे तीनला झोपेतून पाणी प्यायला उठल्या असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला.
म्हणून घरातील कपाट बघितले असता त्यातील २० हजार रुपये रोख, २५ हजार किमतीचे १ तोळ्याची सोन्याची पोत, ६ हजार किमतीचे २ ग्रॅम सोन्याचे कानातले, अडीच हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
याबाबत शीतल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी संजय पाटील करीत आहेत.