Jalgaon News : ब्रेक निकामी झाल्याने बस धडकली ‘डिव्हाइडर’ला; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus accident

Jalgaon News : ब्रेक निकामी झाल्याने बस धडकली ‘डिव्हाइडर’ला; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला

बोदवड : भुसावळ - हरणखेडा बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या एका बाजूस ठेवलेल्या डिव्हायडरला धडकवून चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टाळला. मात्र या अपघातात एका दुचाकीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Nashik Bus Accident: ''दैव बलवत्तर म्हणून दार उघडले नाहीतर...'' प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

भुसावळकडून येणारी बस (एमएच २०, बी एल. ९४८) ही बस बोदवड बसस्थानकाकडे जात असताना जुन्या तहसील कार्यालयासमोरील थांब्यावर काही प्रवासी उतरवून पुढे निघाली. काही मीटर अंतर गेल्यावर ब्रेक मारण्याची गरज पडल्यावर ब्रेक निकामी झाल्याचे चालक राजेंद्र बारी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गिअर बदलत वेग कमी केला व बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटल व नंदिनी साडी सेंटर समोर रोड डिव्हायडरवर धडकवली. या वेळी तिथे उभी असलेली दुचाकी (एमएच १९, डी ४२७१) ही बसच्या पुढच्या चाकाखाली दबून तिचे नुकसान झाले.

हेही वाचा: Nashik ST Bus Accident: ब्रेक फेल झालेल्या एसटीच्या धडकेचा थरार CCTV कॅमेऱ्यात

बसमध्ये सुमारे ५३ प्रवासी होते, असे वाहक प्रदीप बऱ्हाटे यांनी सांगितले. सकाळी वर्दळीच्या वेळी ब्रेक निकामी झालेली ही बस जर आणखी काही फूट पुढे आंबेडकर चौक भागातील व्यापारी संकुलाच्या समोरील रस्त्याने आली असती तर मोठा अपघात होऊन जीवितहानी सुद्धा होऊ शकली असती. चालक बारी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने हा मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत चालक बारी यांच्या खबरीवरून पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonbus accident