Jalgaon Fraud Crime : व्यावसायिकाला साडेपाच लाखांचा ऑनलाइन चुना | businessman was cheated online of Rs 5 lakh 50 thousand jalgaon fraud crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Jalgaon Fraud Crime : व्यावसायिकाला साडेपाच लाखांचा ऑनलाइन चुना

Jalgaon News : बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)साठी किया मोटारर्सची डीलरशिप देण्याच्या नावाखाली रावेर तालुक्यातील एका व्यावसायिकाची तब्बल पाच लाख ५० हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (businessman was cheated online of Rs 5 lakh 50 thousand jalgaon fraud crime news)

सायबर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विजय एकनाथ पाटील (वय ५९, रा. मोरगाव खुर्द, ता. रावेर) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या महिन्यात त्यांना अशोक पांडे आणि धरणीधर पाटील नावाच्या दोन व्यक्तींचा फोन आला.

किया मोटारर्सची बऱ्हाणपूर येथे डीलरशिप देण्याची ऑफर देत (आमिष) दोघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. कार शोरूमसाठी वेळोवेळी आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल पाच लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पैसे देऊनही डीलरशिप देण्यास टाळाटाळ होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी सोमवारी (ता. २४) सायंकाळी सहाला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अशोक पांडे आणि धरणीधर पाटील असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर पुढील तपास करीत आहेत.