Jalgaon Accident News : मद्यधुंद चालकाची दुचाकीस्वारांना धडक; तरुण ठार | car accident with bike Kill youth jalgaon accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident

Jalgaon Accident News : मद्यधुंद चालकाची दुचाकीस्वारांना धडक; तरुण ठार

Jalgaon Accident News : तालुक्यातील निंभोरा व कपिल वस्तीनगरमधील दोघे तरुण दुचाकीने खेडी येथे लग्नासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुवनजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून लघुशंका करण्यासाठी थांबले. (car accident with bike Kill youth jalgaon accident news)

मद्यधुंद अवस्थेत फॉर्च्युनर चालकाने दोघांना धडक दिली. या अपघातात एक ​तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा तरुण जखमी झाला. त्याला गोदावरी रुग्णालयात दाखल केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील हॉटेल मधुवनसमोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास साखरी ब्रिजजवळ भरधाव फॉर्च्यूनर (एमएच १९, इडी ०४४५) कारने दुचाकी (एमएच १९, सीबी २६७९) जोरदार धडक दिली. या अपघातात शेख इरफान शेख रेहमान जागीच ठार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शवविच्छेदनासाठी मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटरमध्ये आणले आहे, तर दुसरा जखमी गौतम वाघ याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ​

याबाबत बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे दाखल झाले आहेत.

टॅग्स :Jalgaondeathaccident case