Accident News : मद्यधुंद कारचालकांचा ‘हिट ॲन्ड रन’चा थरार | car hits two bikes jalgaon accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Jalgaon Accident News : दारू ढोसून कारचालकाचा ‘हिट ॲन्ड रन’चा थरार

Jalgaon Accident News : असोदा (ता. जळगाव) येथे सुसाट कारने दोन दुचाकींना धडक दिली. यात दुचाकीवरील तीन गंभीर जखमी झाले. (car hits two bikes jalgaon accident news)

जळगाव शहरातील एका बांधकाम साईटवर मिस्तरी म्हणून काम करणारे अमृत बाबूराव बारी (वय ४२, रा. यावल), सय्यद अश्‍पाक अली (४०) आणि गणेश पंडित बाविस्कर (३८) रविवारी (ता. १४) दुपारी चारला काम आटोपून यावलकडे दुचाकी (एमएच १९, एडी ६८८८) आणि (एमएच १९, एजी ४२४५)वरून निघाले होते.

असोद्याजवळून जात असताना, समोरून येणारी कारने (एमएच ४३, एएन २६९१) जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघे रोडवर फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना आसोदा ग्रामस्थांनी काही तरूणांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्या नंतर त्यांच्यावर उपचारांना सुरवात झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘हिट ॲन्ड रन’चा थरार

दारू ढोसल्यानंतर कारचालकाने सुसाट वेगात तिघे दुचाकीस्वारांना उडविले. अपघातानंतर ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत चालकाची गाचांडी धरून बाहेर काढले.

दोन कारांची धडक

शिरसोली रोडवरील एका हॉटेलसमोर रविवारी (ता. १४) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एका भरधाव कारने रिव्हर्स येत असलेल्या दुसऱ्या कारला धडक दिली. शिरसोली रोडवर कार (युके ९६१७)चालकाने भरधाव जाणाऱ्या कारला (एमएच ०२, डीजे ६८८४) जोरदार धडक दिली. यात दोन्ही कारचे नुकसान झाले.

याबाबत हवालदार शुद्धोधन ढबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही कारचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार जितेंद्र राठोड तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncaraccident case