Jalgaon News : गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS प्रणाली आवश्‍यक

Revenue-Department Work News
Revenue-Department Work Newsesakal

जळगाव : अनोंदणीकृत व तक्रार नसलेल्या ई-फेरफार नोंदीचा कालावधी ३० दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत आणण्यासाठी महसूल यंत्रणेने स्वयंस्फूर्तीने प्रयत्न केले पाहिजेत. शर्तभंग झालेल्या प्रकरणांसाठी शोध मोहीम राबवावी. अर्धन्यायिक प्रकरणातील आदेशांची गुणवत्ता तपासणी करण्याची मोहीम राबवावी.

ई-ऑफिस प्रणालीचा वापर करावा. गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली लावावीच. वाळू लिलावाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशा सूचना नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. (Carriers of minor minerals Vehicles need GPS system Divisional Commissioner Game Review meeting of revenue department Jalgaon News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Revenue-Department Work News
Nashik News : समृद्धीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या महसूल विभागाच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख एम. पी. मगर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रवींद्र भारदे, प्रसाद मते, किरण सावंत-पाटील, राजेंद्र वाघ, जिल्हा सूचना अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

श्री. गमे म्हणाले, की प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांची कामे अधिक जलदगतीने करावीत. अपवादात्मक परिस्थितीत तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी.श्री. गमे यांनी ई-पीक पाहणी, गौणखनिज, ई-मोजणी, महाराजस्व अभियान, लोकसेवा हमी कायदा, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी, शिस्तभंग कार्यवाही, रिक्त पदे, शासकीय जमीन महसूल व गौणखनिज महसुलाचाही आढावा घेतला.

Revenue-Department Work News
Pune Crime News : मेट्रो सुरू व्हायच्या आधीच चोरट्यांनी मारला डल्ला; साहित्याची चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com