Jalgaon Crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा | case against 5 people in case of harassment of married jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा

Jalgaon News : नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील माहेर व फाफरे (ता. अमळनेर) येथील सासर असलेल्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार शारीरिक, मानसिक छळप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (case against 5 people in case of harassment of married jalgaon crime news)

गायत्री पाटील यांनी तक्रार दिली, की २००५ मध्ये विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तीन-चार वर्षे चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र चारित्र्यावर संशय घेत तसेच गाडी व घर खर्चासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, या मागणीसाठी संगनमताने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या तक्रारीनुसार पती दीपक पाटील, सासू दुर्गा पाटील, दीर गुलाब पाटील (सर्व रा. उधना,सुरत) , नणंद मीराबाई पाटील व नणंदेचा पती राहुल पाटील (रा.चोपडा) या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार विनोद पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrime