Jalgaon News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागातील एका १८ वर्षीय तरुणीने १४ ऑगस्टला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दर्गा अली मोहल्ला गांधलीपुरा भागातील सय्यद इसरत सिकंदर अली (वय १८) या तरुणीने १४ ऑगस्टला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत तरुणीचे फरहान खान फिरोज खान (वय २२) याच्याशी प्रेमसंबंध होते. (Case registered against four persons for abetting self death Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon News : पतंगाच्या दोरी लुटताना जीवनाची दोरी तुटली तर?

ते नेहमी फोनवर बोलत होते. संशयिताने वारंवार तिच्याशी फोनवर बोलताना पैशांची मागणी केली होती व पैसे न दिल्यास बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली होती. मृत तरुणीने दोन वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

तिने ही गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र जेव्हा मृत मुलीच्या आईला ही गोष्ट समजली तेव्हा तिने संशयित फरहान खान फिरोज खान व फिरोजखान यासीन खान यांना समजावून सांगितले होते. तरी देखील फरहान खान फोनवर बोलत होता. तसेच कश्मिरा शेख कामील व अलमास अमिरखान यांनी फोनवरून मृत तरुणीला शिवीगाळ करून हुज्जत घालत होते.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

वरील चारही जणांनी मृत तरुणीचा गेल्या एक वर्षांपासून फोनवर मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने तिला शिवीगाळ करून धमक्या देत असल्याने तरुणीने त्यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मृत तरुणीचे वडील सिकंदर अली मोहम्मद अली सय्यद यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून फरहान खान फिरोजखान, फिरोज खान यासिन खान तलाठी, कश्मिरा शेख कामिल व अलमास अमिरखान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

टॅग्स :Jalgaoncrimesucide case