Jalgaon News : अल्पवयीन मुलीशी लग्न, अत्याचारातून गर्भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

girl harrasment

Jalgaon News : अल्पवयीन मुलीशी लग्न, अत्याचारातून गर्भवती

जळगाव : शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी बळबजरी लग्न करत अत्याचार केल्याने ती गर्भवती (Pregnant) राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (case registered against the husband and in laws for forcefully marrying and torturing minor girl Jalgaon News)

याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आईवडिलांसह वास्तव्याला आहे. मुलगी अल्पवयीन माहिती असताना, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाने तिला २५ जुलै २०२२ ला दुचाकीवर बसवून पळवून नेले होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तरुणाने बहिणीकडे नेऊन तिच्यासोबत लग्न केले. या लग्नाला पीडित मुलीच्या आईचा विरोध असल्याने हा राग मनात ठेवून मुलीला मारहाण करून तिचा छळ करण्यात आला. तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केले. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अनिस शेख तपास करीत आहेत.