Jalgaon News : भ्रमणध्वनीवरून तलाक; पतीसह 8 जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband triple talaq

Jalgaon News : भ्रमणध्वनीवरून तलाक; पतीसह 8 जणांवर गुन्हा

मेहुणबारे (जि. जळगाव) : विवाहितेचा छळ करून भ्रमणध्वनीवरून (Mobile) तलाक दिल्याप्रकरणी नंदुरबार येथील सासरच्या आठ जणांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा

दाखल करण्यात आला आहे. (case registered in Mehunbare police station against in laws for harassing married giving divorce over mobile phone jalgaon news)

आसमा शेख जुनेद या विवाहितेचे माहेर मेहुणबारे येथील असून, तिचा विवाह नंदुरबार येथील जुनैद शेख जावेद याच्याशी झाला होता. लग्नानंतर सात, आठ दिवसांतच सासऱ्यांकडून आसमा हिचा छळ होऊ लागला. जेवण न देता शिवीगाळ, मारहाण होऊ लागली.

त्यातच आसमा हीस मुलगी झाली म्हणून छळ अधिकच वाढला. घर बांधण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र वडिलांचे निधन झाल्याने एवढे पैसे देऊ शकत नाही असे सांगितले असता, पतीने मारहाण करून तीन तलाक देऊन टाकण्याची धमकी दिली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यानंतर आसमा हीस माहेरी पाठवून दिले. २३ जानेवारीला पती जुनेद शेख याने भ्रमणध्वनीवरून ‘मला तुझ्या सोबत राहायचे नाही’, असे सांगून तीन वेळा तलाक बोलून तलाक दिला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती शेख जुनैद शेख जावेद, सासू हमिदा शेख,

जेठ जहीर शेख, तसेच जुबेर शेख, जेठानी मेहजबिन शेख जहीर, अफसिन शेख जुबेर, नणंद नुसरत नईम काझी, नईम मुबिन काझी (सर्व रा. नंदुरबार) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे