Jalgaon News : बैलांची निर्दयी वाहतूक; दोघांविरोधात गुन्हा | case registered in police against two people for Cruel transportation of bullocks jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon News : बैलांची निर्दयी वाहतूक; दोघांविरोधात गुन्हा

Jalgaon News : पिकअप वाहनातून बैलांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered in police against two people for Cruel transportation of bullocks jalgaon news)

समाधान सुरेश पाटील (रा. तरवाडे, जि. धुळे) हे त्यांच्या मित्रासमवेत मेहुणबारेकडे येत असताना जामदा फाटा येथे पिकअप वाहनात (एमएच ०५, बीएच ४८०५) दोन मोठे व दोन लहान बैल निर्दयतेने कोंबून घेऊन जाताना आढळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पिकअपचालकाकडे गुरे खरेदी विक्रीचा परवाना नसल्याचे आढळून आल्याने गुरांसह त्यावरील चालक व वाहन पोलिस ठाण्यात आणून दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार शनिवारी (ता.१३) सकाळी आठला घडला.

याप्रकरणी समाधान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक शरद पाटील व कैलास चव्हाण या दोघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaoncrimebullock cart