Jalgaon Crime News : बंद घर फोडून सोन्या-चांदीसह रोकड लंपास

home robbery
home robberyesakal

Jalgaon News : खोटेनगर परिसरात असलेल्या हिराशिवा कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोकड, असा एकूण ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. (Cash with gold and silver robbery jalgaon crime news)

हिराशिवा कॉलनीतील नम्रता महावीर गादिया शनिवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जेवणासाठी गेल्या होत्या.

त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील सोने व चांदीचे दागिने, १० हजारांची रोकड, असा एकूण ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

home robbery
Jalgaon Crime News : घरी सोडण्याच्या बहाण्याने 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

दुपारी दोनला नम्रता गादिया घरी आल्या. त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता, घरातील समान अस्तव्यस्त दिसून आले.

याबाबत नम्रता गादिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे तपास करीत आहेत.

home robbery
Jalgaon Crime News : गोड बोलत सहा वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग, आईने आरडाओरड करताच..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com