Jalgaon News : ग्रामीण भागही ‘CCTV’च्या निगराणीत; डीवायएसपी जाधव यांची संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Speaking at the inauguration of the CCTV camera, Sub Divisional Police Officer Rakesh Jadhav.

Jalgaon News : ग्रामीण भागही ‘CCTV’च्या निगराणीत; डीवायएसपी जाधव यांची संकल्पना

अमळनेर (जि. जळगाव) : शहरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे, हीच बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातही लोकसहभागाची संकल्पना रुजवत उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी राकेश जाधव यांची

संकल्पना अन् आधार फाउंडेशनचे अशोक पाटील यांच्या सहकार्याने गलवाडे बुद्रुक, गलवाडे खुर्द, झाडी, भरवस व लोणपंचम या गावांमध्ये उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. (CCTV cameras have been installed in about 70 percent of areas with aim of eliminating criminals jalgaon news)

नुकतेच या कॅमेऱ्यांचे लोकार्पण सोहळा राकेश जाधव आणि आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.अमळनेर शहरातून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन व्हावे, या उद्देशाने उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी लोकसहभागातून सुमारे ७० टक्के भागात सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले आहेत.

त्यामुळे चोरट्यांचा कल ग्रामीण भागाकडेही वळला आहे. ग्रामीण भागात बैलजोडी, मोटारसायकल, शेती अवजारे, वीजमोटारी, घरफोडी आदी चोरीच्या घटना तसेच हाणामारी, मुलींची छेडछाड, निवडणुकीतील वाद आदी घटनांना आळा बसावा, या उद्देशाने डीवायएसपी राकेश जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संकल्पना ग्रामीण भागात रुजविण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला.

शिवाय या संकल्पनेला अशोक आधार पाटील यांच्या आधार फाउंडेशनचे सहकार्य लाभले. सीसीटीव्हीसाठी लागणारा निधी हा लोकवर्गणीतून जमा झाला आणि त्यातून गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी, भरवस व लोणपंचम या गावात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

भविष्यात तालुक्यातील सर्वच गावे ही टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याचा राकेश जाधव यांचा मानस आहे. त्यासाठी नागरिकांनी लोकसहभागात पुढाकार घ्यावा आणि आपले गाव सुरक्षित करुन घ्यावे, असे आवाहन डीवायएसपी जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी झाडीचे सरपंच भुपेंद्र पाटील, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ, गलवाडेचे किशोर पाटील, सदस्य व ग्रामस्थ, भरवस, लोणपंचमचे सरपंच अशोक पाटील, उमेश पाटील, राजेंद्र पाटील, रामचंद्र पाटील, विजय पाटील, पवनकुमार पाटील, प्रमोद पाटील, कपिल पाटील, विवेक पाटील, जयेश पाटील, अतुल पाटील, योगेश पाटील, दयाराम ठाकरे,

सुशील पाटील, उदय पाटील, गोपाळ पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, संजय मिस्तरी, महेंद्र पाटील, अशोक पाटील, कुणाल पाटील, चेतन पाटील, गणेश देवरे, रवींद्र देवरे, महेश पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, सुरेश पाटील,

तेजस पाटील, प्रकाश पाटील, प्रतीक पाटील, भूषण पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, गोटू पाटील, शरद पाटील, गोरख पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील, प्रवीण ठाकरे, ईश्वर पवार, अनिल पाटील, पंकज पाटील, समाधान पाटील, रंगराव पाटील, मंगेश पाटील, भिलालीचे लोकनियुक्त सरपंच महेंद्र राजपूत तसेच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष धीरज पवार व राजू पाटील आदी उपस्थित होते.

"अमळनेर शहर गुन्हेगारीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित व्हावा, यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. उपविभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कृती आराखड्यात (अबंधित ४० टक्के निधी) अद्याप या संकल्पनेची तरतूद केली नसेल त्या ग्रामपंचायतींनी या संकल्पनेचा समावेश करून घ्यावा, आणि ही लोकहितार्थ चळवळ अधिक जोमाने रुजवावी." - राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर