Jalgaon News : अनोळखी बालिकेची ओळख द्या बाल कल्याण समितीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

missing child

Jalgaon News : अनोळखी बालिकेची ओळख द्या; बाल कल्याण समितीचे आवाहन

जळगाव : भुसावळ (Bhusawal) रेल्वे स्टेशनमधील मूसाफिर खान्यात आढळलेली बालिका (वय ५ ते ७ दिवस) हिची ओळख देवून तिला पालकांनी घरी नेण्याचे आवाहन जिल्हा बाल कल्याण समितीने केले आहे. (Child welfare committee appeals to identify the unknown girl Jalgaon News)

२३ डिसेंबरला दामिनी ही बालिका (वय अंदाजे ५ ते ७ दिवस) भुसावळ रेल्वे स्टेशन मेन बुकिंग मुसाफिर खान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या पायऱ्यांखाली असलेल्या झुडपामध्ये निराधार अवस्थेमध्ये आढळून आली. या बालिकेस रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन प्राथमिक उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

त्यानंतर बालिकेस बाल कल्याण समितीच्या अध्यक्षाच्या आदेशाने भारतीय समाज सेवा केंद्र (औरंगाबाद) या शिशुगृहात पुढील पुर्नवर्सन करिता दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

बालिकेस पालक, नातेवाईक, ओळखत असलेले व्यक्तींना बाल कल्याण समिती जळगाव (०२५७-२२३९८५१), भारतीय समाज सेवा केंद्र व बाल कल्याण समिती (औरंगाबाद) (०२४०-२३८१४७३, २४५३९२२) येथे संपर्क साधावा.

या बालकाला कौटुंबिक आश्रय द्यावा व सदर बालकाचे कोणी पालक, नातेवाईक यांनी ताबा घेण्यास किंवा अथवा संपर्क न केल्यास बाल कल्याण समितीतर्फे पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांनी दिली.