CM Eknath Shinde : "मनपा संकुलातील गाळेधारकांना न्याय देऊ" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही | Cm Eknath Shinde statement about shop holder in Municipal Corporation jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

CM Eknath Shinde : "मनपा संकुलातील गाळेधारकांना न्याय देऊ" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Jalgaon News : शहर महापालिका, तसेच पालिका संकुलातील गाळेधारकांना न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शासनाने जारी केलेल्या अध्यादेशावर हरकतीचे निवेदन दिले. (Cm Eknath Shinde statement about shop holder in Municipal Corporation jalgaon news)

राज्य सरकारने २६ एप्रिलला राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकेच्या गाळेधारकांसाठी नवीन सुधारित नियमावली जाहीर केली होती व या अधिसूचनेवर एक महिन्यात हरकत घेण्यास सांगितले होते. जळगाव शहरातून, तसेच महाराष्ट्रातून चार ते पाच हजार गाळेधारकांनी आपल्या हरकती पोस्टद्वारे व समक्ष मंत्रालयात जाऊन दाखल केल्या आहेत.

गाळेधारकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर जाऊन हरकतीचे निवेदन दिले. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी निवेदन दिले. राजस कोतवाल, ॲड. अमित सोनवणे, तेजस देपुरा, सुरेश पाटील या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हरकती विचारात घेण्यात याव्यात. महापालिका गाळेधारकांच्या हिताचे नियम बनविण्यात यावे व ते लागू करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समितीमध्ये गाळेधारक संघटनेचा प्रमुख प्रतिनिधी सदस्य म्हणून घेण्यात यावा, निवासी, शैक्षणिक, धर्मदाय व सार्वजनिक प्रयोजनासाठी वर्तमान बाजार मूल्याच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी नाही. त्याऐवजी वर्तमान बाजार मूल्याच्या दोन टक्के भाडे राहील, असे नमूद करावे यांसह तब्बल १३ मुद्यांवर हरकती घेण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

आपण हरकतीबाबत स्वत: सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यानंतर निश्चितच विचार करण्यात येईल व गाळेधारकांना योग्य न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.