Jalgaon News : महामार्गावर दर्शनी भागात वेग मर्यादेचे फलक लावावे : जिल्हाधिकारी मित्तल | Collector directed that speed limit boards should be installed on places where everyone can see on highway jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Aman Mittal instructing the officials in the Road Safety Committee meeting.

Jalgaon News : महामार्गावर दर्शनी भागात वेग मर्यादेचे फलक लावावे : जिल्हाधिकारी मित्तल

Jalgaon News : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक तेथे वाहनाच्या गती मर्यादेचे फलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेत. (Collector directed that speed limit boards should be installed on places where everyone can see on highway jalgaon news)

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी (ता. १३) झाली. तीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस भारतीय राष्‍ट्र महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, वाहतूक शाखेचे निरीक्षक लिलाधर कानडे, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस. सी. धिवरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या दिल्या सूचना

जिल्हाधिकारी म्हणाले, की शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गर्दीच्या ठिकाणी आवश्यकता बघून हायमास्ट लावण्याचे नियोजन करावे. नियमानुसार नसलेले गतिरोधक काढून टाकावेत. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत.

डायर्व्हशन व ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर भविष्यात अपघात टाळण्यासाठी आवश्यकता असल्यास नवीन ब्लॅक स्पॉट निश्चित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

टॅग्स :Jalgaonroad accident