
Jalgaon News : जिल्हाधिकारी महाजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
Jalgaon News : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्वोत्कृष्ट उपक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करून ‘पेन्शन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शुक्रवारी (ता. २१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, संजय गांधी निराधार योजनेचे तहसलीदार जितेंद्र कुंवर यांना सन्मानित करण्यात आले. (Collector Mahajan honored by Chief Minister eknath shinde jalgaon news)
नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी महाजन यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० लाख रुपये, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्यासाठी, तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.