Water Conservation : गांधली, पिळोदेत जलसंधारणाच्या कामांना वेग; 18 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता

Water conservation work started.
Water conservation work started. esakal

Jalgaon News : विप्रो केयर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण प्रकल्पाचे गांधली व पिळोदे येथे जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली. हे काम पूर्ण झाल्यानंतर साधारण १८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होणार आहे.

प्रकल्प २ वेळा भरल्यास ३६ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल. या कामामुळे भूजल पातळी वाढल्याने भाविष्यात ३०० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (Commencement of water conservation works at Gandhali and Pilode of water conservation project jalgaon news)

विप्रो कंपनीचे जितेंद्र शर्मा, आनंद निकम, चेतन थोरात, सुधीर बडगुजर, भावेश साळुंखे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे आप्पासाहेब उगले, ओंकार उगले, आधार संस्थेच्या भारती पाटील, बीएमएमच्या सीमा रगडे, समन्वयक योगेश भामरे, उपसरपंच शिवदास पारधी, राजश्री महाजन, अशोक पाटील, राहुल बाविस्कर, धनंजय कुलकर्णी, प्रवीण पाटील, गिरीश पाटील, किशोर पाटील, श्‍यामकांत पाटील, संजय पाटील, अशोक बाविस्कर, राकेश महाजन, रवींद्र देशमुख, नितीन चव्हाण, हेमकांत पाटील गांधलीचे पोलिस पाटील प्रताप संदानशिव, महिला बचत गटाच्या सदस्या, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जलसंधारण प्रकल्प अंतर्गत सिमेंट बंधारे बांधकाम, नाखोलिकरण रुंदीकरण व गाळ काढणे, गाव तलाव बांधकाम,क्षमता बांधणी आदी कामे केले जाणार असून, या प्रोजेक्टसाठी विप्रो केयर सीएसआर निधीतून येणाऱ्या दोन वर्षात वरील जलसंधारणाचे काम करणार आहे.

या प्रकल्पासाठी लागणारे सर्व तांत्रिक मार्गदर्शन व अंमलबजावणी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (छत्रपती संभाजीनगर) करणार असल्याचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water conservation work started.
Jalgaon News : वाजत गाजत कापसाची लागवड...! दुसखेडा येथील शेतकऱ्याचा अनोखा प्रकार

या कामात ग्रामस्थांकडून एकूण खर्चाच्या पाच टक्के लोकवर्गणीचा वाटा असेल. गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांनी दिलेला पाठिंबा व ग्रामपंचायत सदस्यांचा असलेला पूर्ण विश्वास यामुळेच हे एवढे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

खोलीकरणाच्या कार्यास इथपर्यंत येण्यासाठी गांधलीकरांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा व वेळोवेळी केलेले प्रेझेंटेशन अतिशय महत्त्वाचे होते, असे सुधीर बडगुजर यांनी विप्रोच्यावतीने मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच या संदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

रामकृष्ण महाजन यांनी सूत्रसंचालन केले. आपल्या मनोगतात त्यांनी गांधली गावाचा इतिहास स्व. के. एम. पाटील यांच्यापासून चालत आलेली राजकीय व सामाजिक परंपरा या संदर्भात माहिती दिली.

Water conservation work started.
Jalgaon News : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग दुरुस्तीसाठी 61 कोटींचा निधी : खासदार रक्षा खडसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com