Latest Jalgaon News | 5 कोटींच्या कामाचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निधी देणार : आयुक्त गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news

Jalgaon | 5 कोटींच्या कामाचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निधी देणार : आयुक्त गायकवाड

जळगाव : शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटींच्या निधीपैकी आठ कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त होणार आहे. मात्र, अगोदर पाच कोटी रुपयांच्या कामाचा अहवाल दिल्यानंतरच नवीन आलेला निधी वितरित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Commissioner dr vidya Gaikwad statement Latest Jalgaon News)

शहरातील रस्त्यांसाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने महापालिकेला दिला आहे. शहरातील रस्त्यांची कामे करण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने मक्तेदार नियुक्त केले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रारंभी स्वरूपात शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने पाच कोटी रुपयांचा निधी महापालिका फंडातून दिला होता. कालातंराने शासनाने महापालिकेला पाच कोटी रुपये दिले आहेत. मात्र, महापालिकेने शहरातील दहा रस्त्यांची कामे करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते.

हेही वाचा: Nashik : धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव नाशिकचे शहर पोलिस उपायुक्त

त्यानुसार बांधकाम विभागाने मक्तेदाराला कामाचे आदेश दिले होते. आपण दिलेल्या पाच कोटी रुपयांतून कोणती कामे केली, याची माहिती शासनाने महापालिकेकडे मागितली. त्यानुसार महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. मात्र, या विभागाने अद्यापही महापालिकेला रस्त्यांच्या कामांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

नवीन निधी प्राप्त, पण...

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी ४२ कोटींतील निधीपैकी आणखी आठ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून आल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली होती. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहे. त्यानंतर तो महापालिकेला प्राप्त होणार आहे. याबाबत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले, की शासनाकडून रस्त्यांसाठी नवीन निधी आला, तरी तो वितरित करण्यात येणार नाही. अगोदर दिलेल्या पाच कोटी रुपयांतून कोणत्या रस्त्यांची कामे केली, याचा अहवाल प्रथम बांधकाम विभागाकडून घेण्यात येईल.

हेही वाचा: High Blood Pressure in women : उच्च रक्‍तदाब ठरतोय महिलांचा शत्रू