Jalgaon News : स्वामी समर्थ महाराज अखंड नाम सप्ताहाचा समारोप | Conclusion of Swami Samarth Maharaj Akhand Naam weeks jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Conclusion of Swami Samarth Maharaj Akhand Naam weeks

Jalgaon News : स्वामी समर्थ महाराज अखंड नाम सप्ताहाचा समारोप

Jalgaon News : शहरातील प्रतापनगरमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात मंगळवारी (ता. १८) स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड नाम सप्ताहाचा समारोप झाला. (Conclusion of Swami Samarth Maharaj Akhand Naam weeks jalgaon news)

याप्रसंगी भूपाळी आरती विश्व हिंदू परिषदेचे ललित चौधरी, श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा अमित भाटिया यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी साडेदहाला महानैवेद्य आरती करण्यात आली. सुरू असलेले प्रहरे थांबविण्यात आले.

वीणावादन, श्री स्वामी समर्थ जप, स्वामी चरित्र वाचनाची सांगता झाली. साडेदहाच्या आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या सप्ताहामध्ये जळगाव जिल्ह्यातील हजारो सेवेकरांनी गुरुचरित्र पारायण वाचन, नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, रूद्र याग, स्वामी याग, मल्हारी सप्तशती, वाचन व याग नित्य स्वाहाकार करून आपली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित केली.

जिल्हा प्रतिनिधी विजय निकम यांनी स्वामी समर्थ सेवा मार्गाबद्दल मार्गदर्शन केले. सप्ताहाचे नीलेश देशमुख यजमान होते. कैलास वाणी, नवीन भावसार यांनी पौराहित्य केले. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Jalgaon